पखवाज अलंकार श्री महेश सावंत (कुडाळ – आंदुर्ले ) श्री जगन्नाथ संगीत विद्यालय तर्फे पखवाज शिवतांडव आणि भजनारंग कार्यक्रम सादर
कुडाळ
श्री क्षेत्र उमामाहेश्वरी मंदिर, उडूपी, शिवपाडी,कर्नाटक येथे पखवाज अलंकार श्री महेश सावंत (कुडाळ – आंदुर्ले ) श्री जगन्नाथ संगीत विद्यालय समस्त 101 पखवाज आणि रत्नागिरी ब्रँच श्री संदेश पारधी आणि सहकारी असा 125 पखवाज शिवतांडव आणि भजनारंग कार्यक्रम सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली श्री महेश सावंत सर आणि श्री दत्तप्रसाद खडपकर सर यांच्या मार्गदर्शनात गायक/हार्मोनियम वादक श्री अमित उमळकर, संगीत विशारद श्री ज्योतीराज केळूसकर,कु. तेजू घाडी,कु.चैतन्या वालावलकर,कु.गजानन नाईक,तबला वादक श्री अतुल उमळकर, कु.विनायक जोशी, कु.विराज सावंत. कु.कौशल दूधवडकर,कु.सार्थकी फणसेकर,ढोलकी वादक कु. ओमकार वेंगुर्लेकर,कु.तनय राणे, कु.तुषार गोसावी,कु.रुपेश माडये,कु.वेदांत मांजरेकर,पखवाज विशारद श्री मंदार जाधव,श्री कपिल धाऊसकर,श्री चेतन पेडणेकर, कु.तेजस कदम,कु.मनोहर वालावलकर,कु.प्रार्थना घाडी,यांनी तसेच निवेदक म्हणून श्री दाजी जुवाटकर आणि कु. प्रतिक्षा आरोलकर आणि तालरक्षक म्हणून कु.विठ्ठल सावंत ह्या कलाकारांनी साथ केली या कार्यक्रम साठी श्री नाथाजी मडवळ तसेच समस्त पालकवर्ग यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तसेच उडूपी येथील उमामाहेश्वरी ट्रस्ट चे आदरणीय श्री महेश ठाकूर साहेब यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर नियोजन केले होते आपल्या उत्तर हिंदुस्थानी संगीत कलेचा प्रभाव दक्षिणात्य प्रदेशात श्री महेश सावंत यांनी सातत्याने दाखवून देऊन तेथील रसिकांची मने जिंकली आहेत या वेळी सुद्धा मृदंग तांडव मध्ये सर्व श्रोते न्हावून निघाले यावेळी विद्यालयाचे संचालक डॉ. श्री दादा परब, भजन सम्राट भालचंद्र केळूसकर बुवा यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे यापुढेही संगीत कलेचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून नक्कीच सर्वत्र करू असे पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांनी सांगितले आहे

