*माझी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्यावर सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत एसीबी सिंधुदुर्ग मार्फत कोणतीही कारवाई झालेली नाही.*
*येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास लाचलुचपत विभाग सिंधुदुर्ग यांना जाग आणण्यासाठी कार्यालयासमोर मनसे ढोल बजाव तथा घंटा नाद आंदोलन करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
*सखोल चौकशीअंती कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची एसीबीचे अधीक्षक सिंधुदुर्ग अरुण पवार यांना स्मरण पत्र देत केली मागणी.*
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील बड्या अधिकाऱ्याने पालकमंत्री यांना तब्बल दहा कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याची माहिती स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दैनिक तरुण भारतला मुलाखतीत दिली.दिलेल्या माहितीनुसार त्या बड्या अधिकाऱ्याने आपण सांगू त्या फाईलवर सह्या केल्यास सर्व खात्यांतर्गत पैसे जमा करून दर महिन्याला दहा कोटी रुपये देण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर मान्य केले. या कृत्यासाठी शिक्षा म्हणून सदर लाच देणारे अधिकाऱ्यास निलंबित करण्याची गरज असताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्याची जिल्ह्याच्या बाहेर बदली केल्याचे देखील स्वतः दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत लुचपत विभाग सिंधुदुर्ग यांना सदर प्रकरणी सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप बसाव याकरिता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना तब्बल दहा कोटी रुपयांची लाच ऑफर देणाऱ्या त्या बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. आज रोजी सदर निवेदनावर केलेल्या कारवाईची माहिती विचारली असता एरवी सतत तीन-तीन वर्षे सत्ताधारीच पक्षासाठी एखाद्या व्यक्तीची कसून चौकशी करणाऱ्या एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यावर काहीच उत्तर नव्हते. माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण लाच ऑफर प्रकरणी येत्या पंधरा दिवसात सखोल चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास लाच लुचपत विभाग सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग यांना जाग आणण्यासाठी मनसेतर्फे ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सदर
निवेदन देण्याकरिता जिल्हाध्यक्ष धिरज परब,उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर, माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे,शाखाध्यक्ष नेरुर अनिकेत ठाकुर, अक्षय जोशी, सुरज नेरूरकर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.