*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भीती परीक्षेची ! आजही…!!*
आजही कधीतरी दचकून उठतो
शाळा तर कधीच संपली
दरदरून घाम फुटतो
परीक्षेची धडधड तशीच उरली
गाळलेल्या जागा भरता भरता
आयुष्यात काही जागा तश्याच उरल्या
जोड्या योग्य !जुळवता जुळवता
नात्यांच्या जोड्या एकट्याच राहिल्या
समानार्थी विरूध्दार्थी कळलचं नाही
दोघेही सारखेच वाट्याला आले
अस काही असत! कधी कळलचं नाही
दुस-याच्या पेपरात डोकावून बघावे लागले
संदर्भातही स्पष्टीकरण देता देता
जीवसारा निघून जायचा
म्हणींचा विस्तार करता करता
नियतीचा रट्टा! पाठीवर बसायचा
आयुष्यात अभ्यास कमी पडला
ऑप्शनल प्रश्नांना उत्तरचं नव्हतं
प्रश्नपत्रिका सोपी!असं सदा वाटायचं
अनोळखी ऐच्छिक असं काहीचं नसतं
कवितेच्या ओळी पूर्ण करा……
तिथे मी माझं!मन मोकळं करायचो
शब्दही माझेच!अर्थही माझेच
गुरूदेवांना अनोळखी !परिक्षेत नापास
व्हायचो…
नापास !! दचकून जाग आली…!!
भीती परिक्षेची आजही…
आहे तशीच!!!!!राहिली…!!
बाबा ठाकूर