*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझ्या मराठीचे कौतुके*
माझ्या मराठी कौतुके
देहू आळंदी राऊळ
पंढरीच्या विटेवर
रूप विठ्ठल सावळं
ज्ञाना नामा तुका चोखा
नाथ जनाई कुंभार
अमृताची धार वाहे
सत्सज्जना मुखावर
किती लाघवी लावण्य
परसात परिमळ
हिचा मराठी हो बाणा
चंद्रभागा सम निर्मळ
पुढे वारसा चालवी
थोर साहित्यिक फार
मराठीच्या रक्षणात
येती पुस्तके अग्रेसर
इथे बोलावी मराठी
इथे वाचावी मराठी
गोड अमृताहुनी ही
भाषा मधाळ मराठी
हिचे लेखक फार
रसिक वाचक फार
जगी नाही तोड हिला
हिचा स्वाभिमान फार
माझे मराठी कौतुके
आम्ही गाईन पोवाडे
मुखी अभंग सज्जना
ओवी भजन भारूडे
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8208667477.
7588318543.