You are currently viewing रांगव येथे ७ मार्च रोजी त्रैवार्षिक पांजी सोहळ्याचे आयोजन

रांगव येथे ७ मार्च रोजी त्रैवार्षिक पांजी सोहळ्याचे आयोजन

रत्नागिरी:

श्री परशुरामाच्या पवित्र भूमित रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजेच रांगव. त्या गावात आजची नांदत असलेली खताते कुटुंबीयांची सातवी पिढी वाडवडिलानी जोपासलेली आई भैरी भवानीचा गोंधळ अर्थात त्रैवार्षिक पांजी सोहळा आजही अधिक जोमाने व उत्साहात साजरा करत आहेत.

शुक्रवार दि. ७ मार्च, २०२५ रोजी साजरा करत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास, पुरातन काळापासून चालत आलेल्या पारंपरिक कार्यक्रमाचा एक सुखद अनुभव आपणास मिळावा म्हणून आम्ही खताते बंधू आपणास सहकुटुंब सहपरिवार आग्रहाने निमंत्रित करत आहोत.

तसेच ८ मार्च २०२५ ला श्री सत्यनारायणची महापूजा आणि संस्कृतीक कार्यक्रम पंचक्रोशीतील महिलांनसाठी हळदीकुंकू तसेच लहान मुलांनसाठी झटपट स्पर्धा आयोजित केली आहेत.

आपण या पवित्र सोहळ्यास अगत्यपूर्वक उपस्थित राहून भैरी भवानीचे आशिर्वाद घ्यावेत व आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा