कणकवली :
कणकवली शहरातील सुतारवाडी येथील विश्वकर्मा मित्रमंडळातर्फे शनिवार ८ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता श्री देव स्वयंभू मंदिर मार्गावरील निमेवाडी येथील मैदानावर भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार, सात हजार, पाच हजार, तीन हजार तसेच दोन हजार रुपयांची दोन बक्षिसे तसेच प्रत्येकी ढाल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट बैल जोडी आणि जॉकीसाठी ढाल देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १००० रुपये आहे.
स्पर्धा शासनाच्या नियमाप्रमाणे विनाफटका होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलगाड्याच्या मालकांनी बैलांना कोणताही आजार नसल्याचे प्रमाणपत्र, मालकाच्या आधारकार्डची प्रत, बैलजोडी सोबत मालकाचा फोटो देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रतीक मेस्त्री (९६२३१६९३३१), महेश मेस्त्री, नितीन पांचाळ, अक्षय मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.