*जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्राप्त उत्तुंग यश :**
सावंतवाडी
विद्याविहार इंग्लिश स्कूल, आजगावचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्याविहार इंग्लिश स्कूल, आजगाव येथे समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ श्रेणी पटकावली. या विद्यार्थ्यांमध्ये प्रशालेतील इयत्ता सहावी मधील कु. अस्मी प्रभू तेंडोलकर, कु. स्पृहा आरोंदेकर, कु. अस्मी सावंत, कु. तनिष्क पवार, कु. वैष्णव सावंत, कु. हेरंब नाटेकर, कु. राज गवस, तर इयत्ता पाचवी मधील कु. कुणाल गावडे, कु. मनवा साळगावकर तसेच इयत्ता चौथी मधील कु. लिशा सामंत, कु. जान्हवी सावंत, कु. अद्वैत काळसेकर, कु. उगम वेर्लेकर, कु. वरद राणे व कु. यज्ञेश पवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वरील विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ श्रेणी पटकावली. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संगीताला श्री. अमन अनावकर यांनी ढोलकीची साथ दिली व श्री. प्रसाद सावंत यांनी ड्रमची साथ दिली. प्रशालेतील संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे यांना व वरील स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील स्पर्धेत सहभागी सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.