You are currently viewing वसंत वैभवात रमले, समरसतेचे काव्यकार

वसंत वैभवात रमले, समरसतेचे काव्यकार

चिंचवड गाव:- दिनांक 22-02-2025 रोजी सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक हे ध्येय समोर ठेऊन वाटचाल करणार्‍या समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने अनेक नावीन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबवले जातात. त्यातील एक लोकप्रिय उपक्रम म्हणजे ‘साहित्य -संवाद’ होय.

साहित्य-संवाद अंतर्गत वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी ‘वसंत-वैभव’ या बहारदार कवी-संमेलनाचे आयोजन धर्मगंगा वाचनालय सभागृह, मोरया गोसावी मंदिर परिसर चिंचवड येथे संध्याकाळी करण्यात आले होते.

वसंत येता कोकीळ गातो

मोहर फुलतो आंब्याला

मुरली वाजे ..गौळण लाजे

अंकुर फुटतो राधेला…

या ओळींनी समेलनाची सुरवात झाली आणि जवळपास 40 कवींच्या वसंत ऋतूचे वर्णन करणार्‍या वेगवेगळ्या आशयाच्या कवितांनी समेलन उत्तरोत्तर रंगत गेले. संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या सचिव, मा. लींनाताई आढाव व जेष्ठ कवयित्री छायाताई कांकरीया या कार्यक्रमास पाहुण्या म्हणून लाभल्या. आपल्या मनोगतात छायाताई यांनी माणसाने स्वत:चे जीवन सुखी करण्यासाठी सृष्टीची भाषा समजून घेतली पाहिजे हा विहार मांडला. ही भाषा जर कळली तर प्रदूषण, जागतिक उष्णता वाढीचा धोका कमी होईल असेही त्यांनी सांगितले.

चित्रकार असलेल्या लींनाताई यांनी कवीची कविता चित्रकाराला रेखाटन करण्याची स्फूर्ति देते असे सांगितले.

या प्रसंगी झालेल्या बहारदार कवि समेलनात सुनीता बोडस, अशोक वाघमारे, डाॅ. मृदूला कुलकर्णी, सुप्रिया लिमये, फुलवती जगताप, शोभाताई जोशी, सीमा गांधी वंदना डबीर, उमेंद्र बिसेन, अनिता सुळे, स्नेहा पाठक, श्रध्दा चटप, माधुरी डिसोझा, प्रतिमा काळे, राहूल भोसले, अशोक सोनावणे, अरूण कांबळे, सूर्यकांत भोसले, अशोक होनराव, प्रदीप गांधलीकर, योगिता कोठेकर, रेखा कुलकर्णी सविता इंगळे, सरला जोशी, सुरेंद्र विसपुते, मनिषा पाटील, कल्पना बंब आदि कवि-कवयीत्रींनी भाग घेऊन आपल्या कवितांनी रसिकांना मोहवून टाकले.

सादर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चिटणीस यांनी केले तर, सुहास घुमरे, जयश्री श्रीखंडे, श्रद्धा चटप, सुरेश जोशी, पंजाबराव मोंढे, पुष्कर भातखंडे, स्वाती भोसले, बाबू डिसोझा आदींनी नियोजन केले. शोभाताई जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. धर्मगंगा वाचनालय आणि समरसता साहित्य परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसिद्धी प्रमुख मा. मानसी चिटणीस यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सविस्तर माहिती दिली.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890467468

प्रतिक्रिया व्यक्त करा