मळगांव स्कूलच्या समिक्षा वरकची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड…
सावंतवाडी
मळगांव इंग्लिश स्कूलच्या समिक्षा जानु वरक हिची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघामध्ये निवड झालेली असून ती नाशिक या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
तिच्या या यशाबद्दल मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई, संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर, सचिव.आर.आर.राऊळ कार्याध्यक्ष.नंदकिशोर राऊळ, स्कुल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.फाले, पर्यवेक्षक.श्री. कदम, क्रिडा सल्लागार.डाॅ. शरद शिरोडकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक, ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

