*दोडामार्ग*
*सुमित दळवी*
बऱ्याच दिवसांपासून काम व निधी मंजूर होऊनही प्रलंबित राहिलेल्या साटेली भेडशी बाजारपेठेतील गटार काँक्रीटीकरण च्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी करण्यात आले.
यावेळी सरपंच लखू खरवत ,उपसरपंच सूर्यकांत धर्णे,ग्रामविकास अधिकारी एस बी गावडे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव धर्णे, रामचंद्र भिसे ,प्रकाश कदम ,गणपत डांगी ,शोभना जुवेकर ,लक्ष्मी धर्णे ,प्रमिला धर्णे ,सुजाता नाईक ,ठेकेदार श्री सामंत ,सार्वजनिक बांधकाम चे कर्मचारी अभिजित सदामते आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच सूर्यकांत धर्णे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले तर माजी सरपंच नामदेव धर्णे यांच्या हस्ते कुदळ खोदकाम करून रीतसर भूमिपूजन करण्यात आले.
साटेली भेडशी मुख्य बाजारपेठेत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या दोन्हीं कडेला काही ठिकाणी गटार नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत जाते याचा व्यापारी पादचारी ,वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे या गटाराच्या कामांकडे लक्ष वेधून पावसाळ्यात होणारा त्रास टाळण्यासाठी चांगल्या प्रकारचे काँक्रीट चे गटार बांधण्याची मागणी पाठपुरावा केल्यानंतर हे काम मंजूर झाले मात्र प्रत्यक्षात काम करण्यासाठी जवळपास दोन ते अडीच वर्षे लावली.या रखडलेल्या कामांबाबत ग्रामपंचायतीकडून वारंवार पाठपुरावा केला तर सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर लागलीच हे गटारांचे काम करण्याची कार्यवाही करत शुक्रवारी या कामाचे रीतसर भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली.