गोवा राज्याचे सभापती रमेश तवडकर यांचे ओसरगाव मध्ये बबली राणेंकडून स्वागत
कणकवली
गोवा राज्याचे सभापती रमेश तवडकर यांचे ओसरगाव मध्ये सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी स्वागत केले.पुष्पगुच्छ व सुगरणीचा खोपा देऊन सभापती तवडकर यांचे ओसरगाव तलावनजीक स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी गोवा राज्याचे भाजपचे नेते प्रशांत देसाई ओसरगावचे जेष्ठ भाजप कार्यकर्ते भास्कर पारकर चिनार राणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सभापती तवडकर हे आपला सातारा जिल्हा दौरा आटोपून गोव्याच्या दिशेने निघाले असता त्यांनी काही वेळ ओसरगाव मध्ये थांबून बबली राणे यांची भेट घेत आपुलकी ने चौकशी केली. गेली अकरा वर्ष सभापती तवडकर यांच्याशी बबली राणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 2014 साली तत्कालीन भाजपाचे उमेदवार प्रमोद जठार यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला तवडकर आले होते.