पुणे :
चिखली येथील स्थानिक शाहू नगरात् फाऊंडेशन बुलढाणा जिल्हा वतीने कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छतेचा आणि मानवता संदेश देणारे विज्ञानवादी राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगेबाबा उर्फ डेबूजी यांची जयंती दिवस . ज्यांनी दिवसा गावे खराटे मारून स्वच्छ केली आणि रात्रीला किर्तन केले . समाज मन निरक्षर अडाणी लोकांची मने स्वच्छ केली . शिक्षणाचे महत्व पटवून दिले अश्या महान विभूतींची जयंती आज चिखली शहरात शाहू नगरात उजैनकर फाऊंडेशन बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा परीट संघ यांच्या वतीने साजरी करण्यात आली . यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे उज्जैनकर फाऊंडेशनचे अध्यक्ष – श्री मनोहर पवार तसेच चित्रपट कलांवत, इंडीयन पोलीस चे जिल्हा अध्यक्ष समय कुमार जाधव . त्याच बरोबर परिट महासंघाचे जिल्हा अध्यक्ष भगवान पाटील, रवि पाटील, सुतार पांचाळ समाजाचे संघटक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुर्यवंशी आणि चित्रपट कलांवत मदन गायकवाड आदी उज्जैनकर फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी गाडगे बाबा प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली . आणि प्रासंगिक भाषणे झाली . त्यामध्ये प्रमोद सुर्यवंशी, समयकुमार जाधव, तसेच भगवान पाटील, मदन गायकवाड यांनी थोडक्यात गाडगे बाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.