You are currently viewing प्रा. भाऊसाहेब गोसावी यांना काव्य पुरस्कार

प्रा. भाऊसाहेब गोसावी यांना काव्य पुरस्कार

प्रा. भाऊसाहेब गोसावी यांना काव्य पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित काव्य स्पर्धा

पुणे

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने शेती मातीच्या कविता या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सिंधुदुर्ग येथील कारीवडे गावचे कवी प्रा. भाऊसाहेब गोसावी यांच्या ‘ईरी ईरी फाफरी’ या मालवणी कवितेचा सातव्या क्रमांक आला असून ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या काव्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. लवकरच या काव्य पुरस्काराचे वितरण पुणे भोसरी येथे मान्यवरांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या या काव्य स्पर्धेत महाराष्ट्रातील एकुण १६७ कवींनी भाग घेऊन ऑनलाईन कविता पाठविल्या होत्या. त्यातील ६६ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने निवडल्या होत्या. या कवितांचे परीक्षण ख्यातनाम कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि टी.व्ही. स्टार नामवंत कवी भरत दौंडकर यांनी केले होते. यात प्रथम पाच क्रमांक आणि उत्तेजनार्थ पाच क्रमांक काढून त्यांना काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.
यातुन दहा कविंच्या दर्जेदार कवितांची निवड होवून त्यांना प्रथम पाच क्रमांक व उत्तेजनार्थ पाच असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात सावंतवाडी – कारीवडे गावचे कवी प्रा. भाऊसाहेब गोसावी यांच्या ‘ईरी ईरी फाफरी’ या मालवणी कवितेचा सातव्या क्रमांक आला. ‘ईरी ईरी फाफरी’ या कवितेत प्रा. भाऊसाहेब गोसावी यांनी कोकणातील शेतक-याची व शेतीची झालेली हलाखीची स्थिती, शेतविक्री आणि फसवणुक, गवे, माकडे यांनी केलेले नुकसान, शेतात पीकपाणी येत नसल्याने होणारी दयनीय अवस्था यावर भाष्य केले आहे.
या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे शितल गाजरे, मिलिंद कांभेरे, दत्तात्रय जगताप, ऐश्वर्या नेहे, मनोहर मोहरे, उत्तेजनार्थ पाच क्रमांक पुढीलप्रमाणे इंद्रजित पाटील, भाऊ गोसावी, वत्सला पवार, विशाल कुलट, प्रकाश पाटील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, सचिव प्रा दिगंबर ढोकले, कोषाध्यक्ष मुकुंद आवटे यांनी या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा