🌸 ll श्री देवी भराडी प्रसन्न ll🌸
🙏🏻 श्री देवी भराडी मातेच्या कृपेने संपन्न होणारा…आंगणे कुटुंबीय
🌺 ll आंगणेवाडी वार्षिकोत्सव ll🌺
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५
♦️यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना.. 🙏🏻
🔸देवीचे दर्शन पहाटे ३ वाजता सुरू होईल.
🔹रात्री १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत धार्मिक विधीसाठी दर्शन आणि ओटी भरणे बंद राहील.
🔸रविवारी २३ फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत देवीचे दर्शन सुरू राहील.
🔹एकूण नऊ रांगांतून देवीचे दर्शन सुलभ आणि कमी वेळेत होणार आहे. देवीचे दर्शन रांगेत राहूनच घ्यावे.
🔸देवीचे दर्शन आणि ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास त्वरित आणि सुलभ दर्शन होईल.
🔹कोणत्याही साधनाने देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
🔸वाहने पार्किंगची व्यवस्था कणकवली आणि मालवण दोन्ही बाजूने करण्यात आली आहे.
🔹दुसऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
🔸शिस्त आणि संयमाचा वापर करावा.
🔹दिव्यांग भाविकांना थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
🙏🏻 आपले नम्र🙏🏻
आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी