एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी
मालवण
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम. आय. टी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक पद्धतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण महाविद्यालय शिवमय झाले.हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला यानिमित्ताने कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. या शिवजयंतीमध्ये यावर्षी विशेष म्हणजे एम. आय. टी. एम. च्या महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिवाजी महाराजांच्या जन्म कथेवर आधारित पाळणा हे गीत नृत्यातून सादर केले. तसेच विद्यार्थ्यांमधून सुरज गव्हरे या विद्यार्थ्यांने महाराजाचे प्रेरणादायक भाषण सादर केले. तर अन्य विद्यार्थ्यांनी पावनखिंड नाटकाचे सुंदर सादरीकरण केले.सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रज्वलीत करण्यात आलेली शिवज्योत ढोल ताशाच्या गजरात कॉलेजमध्ये आणण्यात आली. संस्थेचे विश्वस्थ श्री विनोद कदम आणि खजिनदार सौ. वृषाली कदम यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. व्हि. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य श्री. विशाल कुशे सर्व समन्वयक प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री. विनोद कदम यांनी शिवाजी महाराजांच्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा इतिहास सांगितला महाराजांच्या संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांना कॉलेजमधील शिवसंग्रहालयासाठी तलवार भेट दिली. आणि विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे विचार आचरणात आणण्यास सांगितले.या यशस्वी झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाल सेक्रेटरी सौ. नेहा पाल आणि संस्थेचे विश्वस्त श्री केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट कार्यक्रम झाल्याबद्दल अभिनंदन केले.