श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेनिमित्त भेटीसाठी ९ देवस्वाऱ्या येणार
आचरा देवस्वारी ३९, शिरगाव २२ तर १२ वर्षांनी जामसंडेची दिर्बादेवी रामेश्वर कुणकेश्वर भेटीसाठी येणार
देवगड
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा २६ व २७ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी नऊ देवस्वाऱ्या येणार असून, श्री इनामदार रामेश्वर संस्थान, आचरा येथील श्री देव रामेश्वर (कसबा आचरा) ही देवस्वारी ३९ वर्षांनी, शिरगावची श्री देवी पावणादेवी २२ वर्षांनी, तर १२ वर्षांनी देवगड-जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर ही कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
कुणकेश्वर भेटीसाठी येणाऱ्या देवस्वाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत –
1. श्री देव रामेश्वर – कसबा आचरा (श्री इनामदार रामेश्वर संस्थान, आचरा)
2. श्री पावणादेवी – शिरगाव, देवगड
3. श्री गांगेश्वर – नारिंग्रे, देवगड
4. श्री देव माधवगिरी – माईन, कणकवली
5. श्री देव गांगेश्वर – बावशी बेळणे, कणकवली
6. श्री देव जैनलिंग, रवळनाथ, महालक्ष्मी, पावणादेवी (गांगो – बिडवाडी, कणकवली)
7. श्री दिर्बादेवी रामेश्वर – जामसंडे, देवगड
8. श्री गांगेश्वर, पावणाई, भावई – दाभोळे, देवगड
9. श्री पावणादेवी – हुंबरठ, कणकवली
याबाबतची माहिती श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, श्री एकनाथ तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.