पुनावळे बाजार, पुनावळे-
हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त अनिका पिकॅडिली रहिवासीयांनी सुंदर असा शिव जन्मोत्सव सोहळा आयोजित केला. सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले.छत्रपतींची आरती करण्यात आली.तदनंतर शिव जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल अनेकांनी मनोगत व्यक्त केले. “राजं आलं, राजं आलं”, अनुज अभिजित ढोली याने यावर नृत्य सादर केले. सौ. माधुरी वैद्य कुमठेकर यांनी ज्येष्ठ कवी बाबू
डिसोजा कुमठेकर यांनी लिहीलेली छत्रपती शिवराय यांच्यावरील गौरवपर रचना म्हटली. लहान मुलामुलींची चित्रकला स्पर्धा झाली.
युवा व्याख्याते श्री शुभम मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. ते एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलेपर म्हणून काम करतात. व्याख्यानाच्या मानधनातून ते गड किल्ले यांची स्वच्छता आणि संवर्धन काम करतात. तसेच चिंचवड येथील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पुरविण्याचे कार्य करतात. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते महाराष्ट्रभर व्याख्याने देत आहेत. आय स्क्वेअर इट, संस्कृती रक्षक विद्यार्थी या पुरस्काराने ते दोनदा सन्मानित आहेत.
श्री. नितीन वाघ यांनी शिवाजी सावंत यांच्या श्रीमान योगी कादंबरी मधील शिवचरित्रामधील उतारे यांचे बहारदार अभिवाचन केले.
आमंत्रितांचा सन्मान करण्यात आला. सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468

