वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात गुरुवार दि. २१ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयातील एनएसएस (NSS), डिएलएलई (DLLE) व एनसीसी (NCC) विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक समितीचे सचिव श्री. प्रमोद रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे, जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ.राजेश वालावलकर, उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डाॕ.दर्शना कोरगावकर, डिएलएलई विभाग प्रमुख प्रा.पी.एम.ढेरे, एनसीसी विभाग प्रमुख प्रा.रमेश काशेट्टी, प्राद्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालयाचे कामकाज वर्क फाॕम होम पध्दतीने सुरु असताना देखील महाविद्यालयाने शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव प्रमोद रावराणे यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
तरुण वर्गांनी अशा विधायक उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. या शिबिरामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, समाजातील तरुण वर्ग अशा पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॕ.कोरगावकर यांनी केले तर आभार प्रा.सचिन भास्कर यांनी मांडले. शिबिर यशस्वी होण्यासाठी यांनी एनएसएस, डिएलएलई व एनसीसी विभाग, प्राद्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अतिश माईणकर, हर्षल कदम, पूजा यद्रुक, माधुरी पालकर, काजल पेडणेकर या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.