*शिवनेरी किल्ल्यावर माझा शिवबा काव्यसंग्रह प्रकाशन व काव्य मैफल उत्साहात संपन्न -*
शिवजन्मोत्सव निमित्त नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय पुणे वतीने “माझा शिवबा”काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर अतिशय उत्साही आनंद वातावरणामध्ये प्रकाशन सोहळा रंगला.. यावेळी सर्व नक्षत्र कवींनी आपल्या बहारदार काव्यरचना शिवजन्म स्थळाच्या समोर शिवबाच्या गर्जना देत काव्य मैफल संपन्न केली. आणि शिवभक्तांनी त्याचा आनंद लुटला.
शिवजन्मभूमीत शिवनेरी किल्ल्यावर हा सोहळा मनाला उभारी देणारा ठरला. सर्व नक्षत्र खूप आनंदी झाली.
या ‘शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला नक्षत्र काव्य मैफल ‘मध्ये कवी वादळकार, कवी उत्तम सदाकाळ, कवी ज्ञानेश्वर काजळे, कवी अक्षय पवार, सौ. पवार, कवी सुनील थोरात, कवयित्री अलका खोसे, कवी बालाजी थोरात, कवी सतीश कांबळे, कवी रमेश खरमाळे,श्रीयश कांबळे, कवी अशोक उघडे, कवी पियुष काळे, श्री भरत वाजे, श्री महादेव जाधव सर , गणेश डबडे,सचिन फुलपगार,संपत नायकोडी इ. बहारदार काव्य रचना सादर केल्या. यावेळी शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. त्या दिवशीच्या सोहळ्याचे साक्षीदार होता आले .याचा आनंद प्रत्येकाच्या मनावर फुललेला पाहता आला.
यावेळी बालशाहिर आराध्या शिंदे हिच शिवगर्जना आकर्षण ठरली.यावेळी शिवनेरी गडाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळे उपक्रम राबवले जातात. त्यापैकी शिवनेरी गडावर झालेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी नक्षत्र काव्य मैफल उपक्रम कौतुकास पात्र ठरला.
या कार्यक्रमाचे संयोजन आयोजन उत्तम प्रकारे प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले होते. महाराष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.