*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम गीत रचना*
*शिवाजी राजा*
साऱ्या विश्वात शूर नाही कोणी दुजा
असा पराक्रमी माझा शिवाजी राजा ||धृ||
मावळ्यांच्या साथीने घेतली स्वराज्याची शपथ
रायरेश्वराला साकडे घातले अर्पूण स्वरक्त
जन्मला पुत्र माता जिजाऊ पिता शहाजी राजा
असा पराक्रमी माझा शिवाजी राजा ||१||
निजाम आदिलशाहीला सळो की पळो केले
अफजलखानाचे कोथळे बाहेर काढले
छाटून बोटे शाहिस्तेखानाला दिली सजा
असा पराक्रमी माझा शिवाजी राजा ||२||
रत्न शिलेदार सरदार बहु मिळवितो
त्यांच्या पराक्रमांचे डंके चौफेर वाजवितो
जिंकून किल्ले स्वराज्य स्थापितो रक्षण्या प्रजा
असा पराक्रमी माझा शिवाजी राजा ||३||
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*(चांदवडकर)*
*धुळे, ता. जि. धुळे.* ४२४००१.
मो. नं.
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.