You are currently viewing शिवरायांच्या गनिमी काव्याने निजामशाही आदिलशाही सारख्या बलाढ्य शत्रूंनाही पाणी पाजले-कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे

शिवरायांच्या गनिमी काव्याने निजामशाही आदिलशाही सारख्या बलाढ्य शत्रूंनाही पाणी पाजले-कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे

*अर्जुन रावराणे विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न*

 

*पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या वतीने गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप*

 

वैभववाडी :

१९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त राज्यभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने अर्जुन रावराणे विद्यालय, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या वतीने प्रशालेतील गरिब गरजू विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेल्या शालेय साहित्याचे वाटप या प्रसंगी करण्यात आले.

संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. शिवज्योत प्रज्वलित करत प्रा.योगेंद्र चव्हाण यांनी धेय्य मंत्र म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थीनी ईश्वरी रावराणे हिने प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा पोवाडा सादर केला. या कार्यक्रम प्रसंगी ब्रिजेश तुळसणकर, हर्ष जांभळे, ओम रावराणे , स्वरूपा रावराणे , मनस्वी दळवी या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिवरायांचे चरित्र, चारित्र्य व धेय्य यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे मत वैभववाडी पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले तर शिवरायांच्या गनिमी काव्याचे विविध पैलू संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रशालेचे जेष्ठ शिक्षक एस.बी.शिंदे यांनी सध्याच्या काळात शिवरायांच्या विचारांची व शिव संस्कारांची विद्यार्थ्यांना असलेली गरज याबाबत विद्यार्थीना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी शिवरायांच्या युद्ध कौशल्या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.एस.मरळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पी.जे.सावंत यांनी केले.

याप्रसंगी संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, एस.बी.शिंदे, पी.एम.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.एस.मरळकर, पी.बी.पवार, तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा