You are currently viewing शिवजयंतीनिम्मित सिंधू रनर टीमचा आगळा वेगळा उपक्रम

शिवजयंतीनिम्मित सिंधू रनर टीमचा आगळा वेगळा उपक्रम

सिंधुदुर्ग :

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी जगभरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. याच निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. शिवजयंती निम्मित सिंधू रनर टीम ने किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) ते सावंतवाडी (आरमार) सुमारे ६६ किलोमीटर अंतर ३२ धावकांनी न थांबता तब्बल ७ तास आणि २८ मिनिटात हाती शिवज्योत घेऊन पार केले. सिंधुदुर्ग किल्ल्या विषयी कवी भूषण यांनी खालील पंगती लिहिल्या आहेत.

“सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।

जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन,

राज्याचा भूषण अलंकार ।

चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न,

महाराजांस प्राप्त जाहले ।”

सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातून अनेक शिवप्रेमी किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) येथून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या शहरात जातात. या वर्षी सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने हि ज्योत सलग धावून आणि सुरवात ते शेवट म्हणजे मालवण ते सावंतवाडी हे ६६ किलोमीटर अंतर तब्बल ७ तास आणि २८ मिनिटात पूर्ण करून नवीन इतिहास घडवला आणि एकत्रित रित्या एवढे लांबचे अंतर मशाल हाती घेऊन धावणारे शिवरायांचे पहिले मावळे ठरले.

१८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०:१० वाजता हे धावक शिवज्योत घेऊन मालवण वरून सावंतवाडी करीत निघाले या वेळेस त्यांना प्रोत्सहन देण्यासाठी सौ शिल्पा यतीन खोत (युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, श्री यतीन खोत (माजी नगरसेवक मालवण नगरपालिका), इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मालवणहून निघाल्या नंतर चौके, कट्टा, ओरोस, कुडाळ, झाराप मार्गे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७:१० वाजता हे सर्व धावक सावंतवाडी मध्ये दाखल झाली, सिंधू रनर टीम चे धावक यांनी संपूर्ण मोतीतलावा भोवती फिरवून, याची सांगता सावंतवाडी राजवाडा येथे केली. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले यांनी या साहसी उपक्रमात सहभागी सर्व धावकांचा सत्कार सन्मानचिन्न देऊन केला, आणि सावंतवाडी संस्थान च्या युवरादनी सौ श्रध्दाराजे भोसले यांनी या साहसी उपक्रमात सहभागी सर्व लहान मुलांचा सत्कार मेडल देऊन केला. तसेच हि शिवज्योत सतत तेवत राहावे म्हणून एक प्रतीकात्मक दिवा या मशालवरून प्रज्वलित करून सावंतवाडी राजवाडा येथे ठेवण्यात आला.

या आरभार रनमध्ये ओंकार पराडकर, भूषण बांदेलकर, डॉ. स्नेहल गोवेकर, विनायक पाटील, अजित पाटील, प्रसाद बांदेकर, प्रेरणा लोहार, कृतिका लोहार, रेशमा परब, ऋत्विक जाधव, सर्वेश लिंगावत, आशय माडेकर, केशव शिंदे,प्रज्वल चव्हाण, शुभम बावणे, मेघराज कोकरे; नम्रता कोकरे फ्रँकी गोम्स, डॉ. रवी गोलघाटे सहज बुरुड, कबीर हेरेकर मानस सावंत, सुशोभन सावंत, शिवानी तुयेकर, राहुल देसाई, रेहान सारंग, आविष्कार डिचोलकर, लक्ष्मण साळगावकर, प्रकाश चव्हाण, मंथन कांबळ, प्रज्योत राणे आणि सिंधू रनर्स टीमचे हितचिंतक, सहकारी यांचा सहभाग होता.

वरील उपक्रमाबद्दल या सर्व टीम मेंबर्स चे कौतुक होत आहे. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, दैनिक कोकण साद, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनल, सर्व पत्रकार बंधू, डॉ बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्या सावंतवाडी), अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील यात किंचित मात्रहि शंका नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावकतयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारखया कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा