You are currently viewing वडापाव

वडापाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पादाकुलक वृत्त*

*”वडापाव”*

 

मिरचीचा लेवूनी ठेचा

बटाटे पहा नटले सजले

जाळ थांबण्या एकवटूनी

भिजलेल्या बेसनात बसले

 

नेसुनी नवी बेसन साडी

वडा उतरला तेल अंगणी

चरचर झाले गरगर फुगला

वडा भाजला गरम मागणी

 

लाल तिखट अन् हिरवी चटणी

पाहुनी वडा गाली हसला

फुगलेला तो लालसर वडा

मग पावाच्या मिठीत शिरला

 

खाण्या येते लज्जत भारी

पाणी सुटते ओठांवरती

खमंग वाटे कुणा खाउनी

कुणी भाळती वासावरती

 

मिटक्या मारत खाती सारे

एकाने का पोट भरावे..?

आपण खाऊ दुसऱ्या देऊ

कधीतरी सत्कार्य करावे..

 

🖋️©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा