*मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी*
*मा.आम.वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन*
मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या शाली परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज कि जय! जय भवानी, जय शिवाजी! चा जयघोष करीत किल्ल्यावर मिरवणूक काढण्यात आली. मा. आ. वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.तसेच शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव शिवराजेश्वर मंदिर असून शिवसेनेच्या वतीने दरवर्षी याठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,शिवसेना प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे,कुडाळ विधानसभा युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत, मालवण तालुका युवतीसेना प्रमुख निनाक्षी शिंदे, वैभव नाईक यांचा मुलगा राजवर्धन नाईक, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, अमोल वस्त, नारायण कुबल, समीर लब्दे , हेमंत मोंडकर, स्वप्नील आचरेकर,सचिन मालवणकर, भाग्यश्री लाकडे, पूर्वा तारी, महेंद्र म्हाडगुत, भाई कासवकर,किशोर गावकर, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, उमेश मांजरेकर, बंड्या सरमळकर, अक्षय भोसले,सुहास वालावलकर,परेश तारी, चिंतामणी मयेकर ,दीपेश लब्दे,संतोष कांबळी,राजू मेस्त्री, साई वाघ आदींसह किल्ला रहिवाशी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.