You are currently viewing या हिंदवी स्वराज्याचा एकच बाप महाराज शिवछत्रपती

या हिंदवी स्वराज्याचा एकच बाप महाराज शिवछत्रपती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*या हिंदवी स्वराज्याचा एकच बाप महाराज शिवछत्रपती* 

 

स्वराज्यासाठी लढले महाराज

रयतेसाठी झगडले

मातीशी इमान राखून

गडकिल्ल्यांवर भगवे फडकवले

 

किती फितूर झाले किती गद्दार निघाले

पण शुर शिवबा नाही डगमगले

स्वराज्य रक्षणाचा घेऊन ध्यास

बेइमानास यमसदनास धाडले

 

सत्यास सर्वस्व समजूत

अन्यायास विरोध केला

शमशेरीचा वार घालून

एक एक मावळा लढला

 

किती गड आलेत

किती सिंह गेलेत

पर्वा जीवाची न करता

किती रक्ताचे पाट वाहिलेत

 

जातपात भेद न करता

जनहीताचा सन्मान केला

सर्व धर्म समभाव राखून

जनकल्याणाचाच आदर झाला

 

स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा

एकच मंत्र जपला

आई जिजाऊच्या शिकवणीतून

एकच शिवबा घडला

 

या भूमातेसाठी जगला

या भूमातेसाठी मेला

राष्टमातेच्या पोटी असा रत्न जन्मावा

त्या औरंग्यासही हेवा वाटला

 

जिवंत आहात महाराज आजही तुम्ही

तुमच्या सारखा राजा होणे नाही कारण

हर महादेवाच्या गजरात

भुमंडली उंचावली ख्याती

या हिंदवी स्वराज्याचा

फक्त एकच बाप राजा शिवछत्रपती

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा