*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्या बटांचे रूप वेगळे*
असून चित्रकार मी खानदानी
माॅडेल झाले *तुझ्याचसाठी*
बसून सामोरी रोज तुझ्या मी
कळले नाही झालेली *मोठी*
//1//
केस मिशीचे टोचता *ओठी*
ब्रशही सारे *लज्जित* झाले
मिठीत गेले *तुझ्या* कधी मी
कळले तेव्हाच *दिवस* गेले
//2//
तेव्हाच बटांनी केला *घात*
नको म्हणता कुशीत शिरले
पर्याय नव्हता लग्ना शिवाय
पत्रिके वाचून नाही *अडले*
//3//
असून *रंग* विभिन्न आपले
सद् गुणांनी *कार्य साधले*
नाही झाला *बभ्रा* कोठे
कलावतीची *कविता* झाले
//4//
म्हणून वाचते *तुझ्या* कविता
संग्रहाकरीता *रोज निवडते*
असल्या “पुष्कळ” माझ्यावरती
कुठे कधी *मर्यादा* न सोडते
//5//
मुखपृष्ठ सजले माझ्या छबीने
सात्विक असेल *प्रस्तावना*
इमेज असून चित्रकार कवीची
प्रसिद्ध करू *समारंभाविना*
//6//
*तुझ्या बटांचे रूप वेगळे*
नाव संग्रहाचे *निश्चित* केले
ऐकून तोंडाचे *चंबू झाले*
संमेलना आधी प्रकाशित झाले
//7//
विनायक जोशीं 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

