You are currently viewing यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुन्हा चाचणीची सक्ती नको!

यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुन्हा चाचणीची सक्ती नको!

शिक्षक भारतीने शिक्षणाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष!

तळेरे

जिल्ह्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शाळेतील पाचवी ते आठवी वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे covid-19 साठीची rt-pcr चाचणी करून घेणे बंधनकारक असले बाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापकांना एका पत्राद्वारे कळविण्यात आहे. पण, आपल्या जिल्ह्यात दि. 23 -11- 2020 पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. बहुतांश शाळांमध्ये पाचवी ते दहावी वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये पाचवी ते आठवीला शिकविणारे शिक्षक हे इयत्ता नववी व दहावीसाठी अध्यापन करीत असून त्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच rt-pcr चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापकांना यांच्याकडे सादर केलेला आहे. तरी कृपया rt-pcr चाचणी करून दाखला सादर केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सदरचे आदेश रद्द समजण्यात यावेत आणि तशा प्रकारचे आदेश निर्गमित करण्यात यावेत अशी विनंती जिल्हा शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाध्यक्ष
तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व दत्ताराम नाईक यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

सिंधुदुर्गनगरी: शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मंद्रुपकर यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आरटीपीसीआर कोविड चाचणी संदर्भात बदलाविषयी निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष वेतुरेकर व शिक्षक भारती संघटनेने दत्ताराम नाईक

प्रतिक्रिया व्यक्त करा