You are currently viewing सावंतवाडी येथे विहिरीत कोसळलेल्या गाईला जीवदान…

सावंतवाडी येथे विहिरीत कोसळलेल्या गाईला जीवदान…

सावंतवाडी येथे विहिरीत कोसळलेल्या गाईला जीवदान…

सावंतवाडी:

येथील सालईवाडा परिसरात असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये गाय कोसळल्याचा प्रकार आज येथे घडला. दरम्यान ही बाब तेथील रहिवासी फारूख शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेला याची माहिती दिली. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून गाईची सुटका केली.

दरम्यान शहरात अनेक ठिकाणी कठडा नसलेल्या विहीरी असून त्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. यादृष्टीने उपययोजना करण्यात यावी व मुक्या प्राण्यांसह मनुष्याला धोका पोहचू नये याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे‌.

प्रतिक्रिया व्यक्त करा