You are currently viewing आधारवड जेष्ठनागरिक संघात रुपेश पवार यांचे शिवचरित्रावर व्याख्यान

आधारवड जेष्ठनागरिक संघात रुपेश पवार यांचे शिवचरित्रावर व्याख्यान

ठाणे :

आधारवड ज्येष्ठ नागरिक केंद्रातर्फे ठाण्यातील मानपाडा येथे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवजयंतीचे आयोजन केले आहे. यावेळी आधारवड जेष्ठ नागरिक केंद्रात इतिहास प्रबोधक, साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांचे व्याख्यान होणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करावा.

रुपेश पवार यांचा व्याख्यानाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून! यातून रुपेश पवार हे संपूर्ण शिवचरित्र मांडणार आहेत. शिवाजी महाराजांचे युद्धप्रसंग, त्यातील नाट्य, त्यांच्या कल्याणकारी राज्याची भूमिका हे सर्व या व्याख्यानात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आधीची भारताची परिस्थिती ते थोडक्यात मांडणार आहेत. *या कार्यक्रमाची सुरुवात लोकप्रिय कवी, साहित्यिक जयंत भावे हे पोवाडा सादर करणार आहेत*. पोवाडाचा विषय आहे ‘जाणता राजा शिवछत्रपती’ आधारवड ज्येष्ठ नागरिक केंद्राच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम प्रेमभावे आयोजित केला आहे. – पत्ता : आधारवड जेष्ठ नागरिक केंद्र, काॅसमाॅस हेरिटेज, हॅपी व्हॅली समोर, चितळसर मानपाडा,ठाणे,( पश्चिम). बुधवारी १९ तारखेला सायंकाळी ५ वाजता.

प्रतिक्रिया व्यक्त करा