You are currently viewing मराठी उद्योजकांसाठी सुवर्णसंधी: शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार आणि बाजारपेठ

मराठी उद्योजकांसाठी सुवर्णसंधी: शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार आणि बाजारपेठ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाराष्ट्रातील बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिव उद्योग संघटना कार्यरत आहे. व्यवसायाच्या यशाचे गमक म्हणजे उत्कृष्ट विक्री आणि प्रभावी मार्केटिंग तंत्र. आज मराठी उद्योजक मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात, परंतु मार्केटिंग आणि विक्री तंत्रांअभावी व्यवसाय वाढवण्यास अपयशी ठरतात.

बऱ्याच मराठी व्यावसायिकांकडे मोठे मार्केटिंग बजेट नसते, तसेच केवळ (सोशल मीडिया) समाज माध्यमांवर पोस्ट केल्याने विक्री वाढेल, असा गैरसमज असतो. परंतु, विक्री वाढवण्यासाठी प्रभावी प्रक्रिया आवश्यक असते. यावर मात करण्यासाठी आणि स्थानिक उद्योजकांना मदत करण्याच्या उद्देशाने शिव उद्योग संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात “रिसेल करणाऱ्या महिलांची टीम” तयार करत आहे.

ज्या महिला रिसेलर म्हणून कमिशनवर काम करू इच्छितात किंवा स्वतःची टीम उभारू इच्छितात, त्यांनी दीपक विठ्ठल काळीद 9820317150 यांच्याशी संपर्क साधावा.

ही संधी केवळ उद्योजकांसाठीच नाही तर महिलांसाठीही स्वयंरोजगाराचे दार उघडणारी आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी संधीचा लाभ घ्यावा!

प्रतिक्रिया व्यक्त करा