*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”अज्ञाताचा शोध”*
मनुष्य अखंड घेतोय अज्ञाताचे शोध
ज्ञात मर्यादित आहे अज्ञात अमर्यादितIIधृII
सगुणाकार दिसतो मनोहारी चंद्र
क्षय लोप पावे निराकाराच्या पोकळींत
पुन्हा वाढे कले कलेने होई दृश्यमानII1II
विश्व रंगमंचावर चाले दृश्या-दृश्य नाट्य
तारे अंधाऱ्या रंगमंचावर तरंगतायत
अंतर्गत गुरुत्वाकर्षणामुळे नांदती एकत्रII2II
मनुष्याला एक शिर दोन पाय दोन हात
बोलण्याची व्यक्त होण्याची बुद्धी उपजत
चव रस गंध स्पर्श तर्क सुख-दुःख ज्ञानII3II
समुद्राच्या जळाचे बनती मेघ उष्णतेनं
मेघ पेलती अधांतरी प्रचंड वजन
गरजती बरसती सृष्टीला करिती संतृप्तII4II
भुकेल्याला ईश्वर देतो वेळेवर अन्न
जन्ममृत्यू वेळ अनाकलनीय अज्ञात
सूर्य चंद्र दिन-चक्र चाले अखंड नियंत्रितII5II
श्री.अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

