You are currently viewing वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे दिगंबर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे दिगंबर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडी :

वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले.

दिगंबर पाटील म्हणाले, विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी त्यांच्यासोबत तालुकाअध्यक्ष म्हणून काम केले आहे. भविष्यात भाजप पक्षात प्रामाणिक राहून संघटनात्मक बांधणीसाठी काम करणार आहे. तालुक्यातील अन्यही कार्यकर्ते येणार आहेत.

यावेळी दिगंबर पाटील, अविनाश पडवळ, तानाजी पडवळ, श्रीपत शिर्के, दीपक खोडपे, गोविंद मोरे, सुधीर पडवळ, अनिल साळसकर, प्रभाकर खोपडे, अनंत कदम, चंद्रकांत कदम, दौलत जिनगरे, श्रीधर मोरे, अनंत गुजर, जगन्नाथ चव्हाण, किरण मोरे, बाबुराव कदम, जितेंद्र गुजर, अरुण कदम, प्रकाश कदम, बाबुराव कदम, प्रकाश जामदार, संतोष माळकर, राजेंद्र वारंग, हेमंत पाटील, हिंदुराव पाटील, अनिल पाटील, संतोष पाटील, नंदकुमार पाटील, रामकृष्ण पाटील, अक्षय पाटील, किरण पाटील, वसंत पाटील, अनंत माळकर, अमर पाटील, यशवंत शाशवटे, हिराचंद्र माळकर, गणपत धावडे, संदीप हक्के, विलास शाशेवटे, विजय चव्हाण, हरिश्चंद्र सावंत, नवनाथ गुरव, सुरेश हक्के, विश्वनाथ पाटील, रवींद्र सरफरे, नंदकुमार पाटील, श्रीकृष्ण सकपाळ, अनिल गुरव, यशवंत साखरकर, रवींद्र सावंत, काशिनाथ दळवी, सुधीर पवार, तुकाराम पवार, रामकृष्ण कोलते, अनंत कोलते आणि अरुण कोलते यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा