You are currently viewing झोपताना उशीखाली…

झोपताना उशीखाली…

झोपताना उशीखाली
मंगळसुत्रा बरोबर मीही
काढून ठेवते माझी सारी
बंधनं आणि नातीगोतीही..
बाजूला सारुन ठेवते
माझं आईपण व बायकोपणही,
या वजाबाकीतून उरते
थोडीशी का होईना
अपूर्णांकात फक्त मी,
एकटीच..!

मग माझा चालतो
माझ्याशीच संवाद,
एकटं एकटं आठवणींच्या
राज्यात हुंदडायला
मलाही खूप आवडतं
निवांतपणे,
स्वप्नही पाहता येतात
मोकळेपणाने,
माझाच मी घालत असते
वास्तव आणि स्वप्नांचा मेळ..
पण बर्‍याच वेळा होतो
त्यांचाही विसंवाद..

कारण,
जाग आल्यावर उशीखालच्या
मंगळसुत्रा बरोबरच संसाराची
बंधनंही आपोआप
बिलगून जातात तत्परतेनं,
माझ्याही नकळत
अंगाखांद्यावर सवयीनं..!
*संग्रह #अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

*संवाद मीडिया*

*🥐🥐 ओल्या काजूचे गर…..*🥐🥐

*उत्कृष्ट दर्जा‌, अप्रतिम चव, व माफक दरात*
*उपलब्ध आहेत.*

*आजच संपर्क साधा*

*ओले काजुगर*
*1600/- रु. प्रती किलो*

*मध,कोकम सरबत,आगुळ,काजुगरही उपलब्ध*

*🌱🌱 शितल नर्सरी फोंडाघाट 🌱🌱*

*संपर्क – 9422373327*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा