You are currently viewing हृदयी वसंत फुलला

हृदयी वसंत फुलला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हृदयी वसंत फुलला*

 

तारुण्याच्या उंबरठ्यावर

प्रीतीचा पाऊस पडला

सुंदर बाला नयनी दिसता

हृदयी वसंत फुलला…

 

ऋतु यौवनाचा येता

मधुमास रंग ल्याला

मनमोराचा पिसारा फुलता

हृदयी वसंत फुलला…

 

बहर येता प्रित फुलाला

प्रेमाचा सुगंध दरवळला

नयन सुखात रमता गमता

हृदयी वसंत फुलला…

 

प्रणयाराधना शशी निशेची

उधान येई सागराला

प्रणयक्रिडा क्षितिजावर बघता

हृदयी वसंत फुलला…

 

सूर्यकिरणे दिपून गेली

नयनी भिडता रजनीबाला

आयुष्याच्या वळणावरती

हृदयी वसंत फुलला…

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर ,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा