You are currently viewing हळवल फाटा अपघातांनंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग 

हळवल फाटा अपघातांनंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग 

पालकमंत्री यांच्या सूचनेनंतर हळवल फाटा येथे रम्बलर स्ट्रिप्स घालण्याचे काम सुरू; नागरिकांमधून समाधान व्यक्त

कणकवली :

मुंबई-गोवा महार्गावरील हळवल फाटा येथे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार शुक्रवारी गडनदीवरील उड्डाणपुलापासून महामार्गावर रम्बलर स्ट्रिप्स लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी काल झालेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाला सुचना दिल्या. त्यानुसार रंबल घालण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील वळण धोकादायक आहे. या वळणावर काल झालेल्या एका भीषण अपघातात आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले होता. त्यावेळी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या घटनेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेत महामार्ग प्राधिकारण व जिल्हा प्रशासनाला रम्बलर बसविण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी रम्बलर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हळवल गावाकडे दशक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणेंचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा