You are currently viewing ‘कथा कलश’ कथा संग्रहाला पुरस्कार 

‘कथा कलश’ कथा संग्रहाला पुरस्कार 

गुजरात :

गेली ७४ वर्ष अव्याहतपणे कार्यरत असलेल्या गुजरात राज्यातील बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेचे वार्षिक द्विदिवसीय अधिवेशन नुकतेच महाराणी चिमणाबाई हायस्कूल येथे पार पडले.

यावेळी परिषदेतर्फे आयोजित साहित्य स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. नागपूरच्या लेखिका आसावरी इंगळे यांना त्यांच्या ‘कथा कलश’ या पहिल्या कथा संग्रहाला अखिल भारतीय उत्कृष्ट कथा संग्रहाच्या द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष मिलिंद बोडस, कार्यवाह संजय बच्छाव व चेतन पावसकर, कोषाध्यक्ष शशांक केमकर व्यासपीठावर उपस्थित होते. साहित्य क्षेत्रात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा व सन्मानाचा मानला जातो.

जामनगर स्थित आसावरी इंगळे ‘स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंकाच्या’ संपादिका असून विविध साहित्य स्पर्धेत त्यांच्या कथा, कविता, एकांकिका व पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा