You are currently viewing चीपी कालवंडवाडी येथे शॉटसर्किट मुळे आग लागून घर बेचिराख : लाखोंचे नुकसान

चीपी कालवंडवाडी येथे शॉटसर्किट मुळे आग लागून घर बेचिराख : लाखोंचे नुकसान

चीपी कालवंडवाडी येथे शॉटसर्किट मुळे आग लागून घर बेचिराख : लाखोंचे नुकसान

परुळे

चीपी कालवंडवाडी येथील घराला रात्री शॉटसर्किट होऊन लागलेल्या आगीत पूर्ण घर जळून बेचिराख झाले आहे. दुर्घटने वेळी घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीमुळे घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चीपी कालवंडवाडी येथील श्रीमती शुभप्रभा सीताराम चव्हाण व वैभवी विजय पवार यांचे हे घर. घराला आग लागल्याने घराचे प्रचंड नुकसान झाले सुदैवाने या दोन्ही महिला बचत गटाच्या मीटिंग ला गेल्याने बचावल्या आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच चीपि सरपंच माया चव्हाण, ग्रामसेवक मंगेश नाईक, तलाठी दि .एस. गवते, पोलीस पाटिल संदेश पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी कोतवाल रुक्मानंद वरक, सुनील राठीवडेकर आदी उपस्थित होते.सदर आगीत हे घर पूर्णपणे बेचिराख होऊन नुकसान झाले आहे. दरम्यान शिवसेना पक्षाचे सचिन देसाई आणि कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांनी आपद्ग्रस्तांना भेट देऊन पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा