You are currently viewing तिलारी घाटातील संरक्षण कठडा दुरुस्ती कामाचा आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतला आढावा 

तिलारी घाटातील संरक्षण कठडा दुरुस्ती कामाचा आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतला आढावा 

तिलारी घाटातील संरक्षण कठडा दुरुस्ती कामाचा आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतला आढावा

२८ फेब्रुवारी पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

दोडामार्ग

गोवा दोडामार्ग तिलारी घाट मार्गे बेळगाव कोल्हापूर, पुणे, हा अत्यंत जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाट रस्ता संरक्षण कठडा दुरुस्ती काम सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी सुरू केले आहे. पण हे काम धिम्या गतीने कमी मनुष्यबळ, काम संशयाच्या भोवऱ्यात होते. चंदगड विधानसभा मतदारसंघ आमदार शिवाजीराव पाटील यांनी दखल घेऊन. तिलारी घाटातील कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी ठेकेदार याना बोलावून घेतले. यावेळी काम जलद गतीने झाले पाहिजे मनुष्यबळ वाढव डे नाईट काम कर वाटल्यास सुरक्षा पुरवा अशा सूचना करून कोणत्याही परिस्थितीत २८ फेब्रुवारी पर्यंत काम पूर्ण झाले पाहिजे. अशा सूचना आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी घाट रस्ता दुरुस्ती काम धिम्या गतीने सुरू आहे. याबाबत या भागातील नागरीकांनी तसेच यांनी आमदार शिवाजीराव पाटील तसेच संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या कानी घातले होते. ज्ञानेश्वर गावडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे लक्ष वेधले होते. शिवाय याबाबत सविस्तर वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. चंदगड विधानसभा मतदारसंघ आमदार शिवाजीराव पाटील यांनी गुरूवारी तिलारी घाटात भेट दिली. यावेळी चंदगड बांधकाम विभाग अधिकारी मुल्ला, सुपरवायझर ठेकेदार, इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित ठेकेदार याला मनुष्यबळ नाही तर काम लवकर होणार नाही. तेव्हा वीस पंचवीस कामगार घे तसेच जर इतर कामे यासाठी निधी कमी पडत असेल तर तो तातडीने उपलब्ध करून द्या अशा सूचना कोल्हापूर बांधकाम विभाग मुख्य अभियंता यांना दूरध्वनी वरून दिली. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना फोन करून तिलारी घाटाची पाहणी करावी अशी सूचना केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा