रेडीच्या यशवंतगड येथे शिवजयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम.!
दुर्गरक्षक प्रतिष्ठानच्या (शिवप्रेमी यशवंतगड) वतीने आयोजन.
वेंगुर्ला :
तालुक्यातील रेडी यशवंतगड येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांसोबत जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रेडी येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ०७.३० वाजता शिरोडा येथील श्री देवी माऊलीची ओटी भरून बाईक रॅलीने सुरुवात होऊन ०८.०० वाजता शिरोडा बस स्थानक येथील शिवजयंती पुजन व त्यानंतर शिरोडा बाजारपेठेतून बाईक रॅली ही ०८.४५ वाजता रेडी ग्रामपंचायत येथे थांबून नंतर किल्ले यशवंतगड येथे बाईक रॅलीने प्रस्थान होईल. गडाच्या पायथ्याकडून पालखीवर फुलांची उधळण व जयघोष करीत ०९.०० वाजता किल्ले यशवंतगड येथे पूजनस्थळी पालखी पोहोचेल. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक मूर्तीपूजन होऊन १०.०० वाजता शिववंदना, ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र होऊन सर्व रयतेसाठी शिवपूजनाची सुरुवात होईल. उपस्थित सर्व महिला वर्गासाठी हळदीकुंकू कार्यक्रम असेल. १०.३० वाजता जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा सुरु होईल. दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन हे ३ गटांमध्ये करण्यात आले असून प्राथमिक गटामध्ये इयत्ता पहिली ते सहावी हा लहान गट असून त्यासाठी पौराणिक विषयावर सादरीकरण करावयाचे आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रु. १००१/- श्री निखिल स्वागता, शरद तानावडे, बांदा पुरस्कृत, द्वितीय रु. ७०१ सौ. अनसा वासुदेव भगत, रेडी, पुरस्कृत, तृतीय रु. ५०१/- श्री ज्ञानेश्वर राणे, मळगाव पुरस्कृत, माध्यमिक गटामध्ये इयत्ता सातवी ते दहावीसाठी ऐतिहासिक अथवा पौराणिक विषयांवर सादरीकरण करावयाचे असून प्रथम पारितोषिक रु. १५०१/- सौ. शितल साळगावकर,शिरोडा, पुरस्कृत द्वितीय रु. १००१/- सौ मिनल मंगेश पंडित, रेडी पुरस्कृत व तृतीय रु. ७०१/- श्री ज्ञानेश्वर राणे, मळगाव पुरस्कृत, खुल्या गटासाठी ऐतिहासिक विषयांवर सादरीकरण करावयाचे असून प्रथम पारितोषिक रु. २००१/-,द्वितीय रु. १५०१/-, तृतीय ₹१००१/- ही सर्व पारितोषिक रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,रेडी यांच्याकडून पुरस्कृत केली आहेत. सर्व स्पर्धकांना सादरीकरणासाठी ३ मिनिटांचा कालावधी असणार आहे. सर्व सहभागी विजेत्यांना सन्मानचिन्ह दिले जाईल. स्पर्धकांची नावे १७ फेब्रुवारीपर्यंत भूषण मांजरेकर-८५५०९३६४४० व अनिता भगत – ९४२३२६१५३३ यांच्याशी संपर्क साधून नोंदवावीत. शिवप्रेमींनी ह्या उत्सवात उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्गरक्षक प्रतिष्ठान, रेडी (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने करण्यात आले आहे.
ADVT –