*कुडाळ तालुक्यातील डिगस गावचे गिरीश ( भाऊ ) सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड .*
कुडाळ
श्री.गिरीश सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सेवादलच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डिगस ग्रामपंचायत सरपंच सौ.पुनम पवार यानी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला .
डिगस गावचे सुपूत्र असलेले गिरीश सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते असुन मुंबई मध्ये दहिसर – आनंदनगर हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे . मुंबई महानगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून लढवलेली आहे . कोकण ची संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत . अश्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्याला प्रदेश स्तरावर पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याबद्दल स्वतःच्या गावात ग्रामपंचायती मध्ये सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी जि.प.सदस्य श्री.अमरसेन सावंत,माजी पं.स.उपसभापती श्री. शिवाजी घोगळे, माजी सरपंच श्री.नित्यानंद कांदळगावकर, माजी सरपंच श्री.राजू पवार व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले.
,