*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उरलेले श्वास माझे*
झाले सारेच जगून
अंतरात आस नाही
थोडे आता उरलेले
जीवनात श्वास काही
विहरले पक्ष्यांसम
मेघ गहिरे पाहिले
नभ पडले अपुरे
रंग मांडावया गेले….
आयुष्याची भातुकली
खेळ खेळता प्रवीण
कधी तुटली जुळली
नात्यांमधे घट्ट वीण….
मनी होते समाधानी
नाही अपेक्षा ठेवली
पदरात आले दान
अंतरात सुखावली…..
सुख उरी कवळले
दुःख लोटले ते दूर
अश्रू कोणते म्हणावे
नयनात वाहे पूर…..
दिवा चालला विझत
हात आडोसा धराया
श्वास किती उरलेले
संपवली मोहमाया….।।
➿➿➿➿➿➿
अरुणा दुद्दलवार@✍️