You are currently viewing सावंतवाडीत ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा…

सावंतवाडीत ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा…

सावंतवाडी

येथील मुक्ताई बुदधिबळ व कॅरम ॲकेडमी आणि श्री चेस ॲकेडमी, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हास्तरीय खुली बुदधिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येथील श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाच्या हाॅलमध्ये ३१ जानेवारीला घेण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रीमंत श्रदधाराजे भोंसले यांच्या शुभहस्ते आणि प्रांत श्री.सुशांत खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.रोहीणी सोळंके, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सुर्यकांत पेडणेकर, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे.
स्पर्धेत खुल्या गटात प्रथम रु.1500 व चषक, द्वितीय रु.1000 व चषक, तृतीय रु.700 व मेडल,चौथा रु.500 व मेडल, पाचवा रु.300 व मेडल आणि 20 वर्षांखालील विदयार्थी गटात प्रथम रु.200 व मेडल, द्वितीय रु.100 व मेडल, तृतीय मेडल आणि 13 वर्षांखालील विदयार्थी गटात प्रथम रु.200 व मेडल, द्वितीय रु.100 व मेडल, तृतीय मेडल आणि 20 वर्षांखालील विदयार्थिनी गटात प्रथम रु.200 व मेडल,द्वितीय रु.100 व मेडल, तृतीय मेडल अशी चार गटांमध्ये एकूण चौदा पारितोषिके देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रं देण्यात येणार आहे.
स्पर्धा भारतीय बुदधिबळ संघटनेच्या नियमांनुसार एकत्र स्विस लीग राउंड्स पदधतीने खेळविण्यात येईल. स्पर्धकांच्या संख्येवर राउंड्स आणि वेळ ठरविण्यात येईल. नाव नोंदणीची अंतिम तारीख शनिवार दि.30 जानेवारी आहे. अधिक माहीतीसाठी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर आणि श्री चेस ॲकेडमीचे संचालक श्रीकृष्ण आडेलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा