You are currently viewing मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात आरवली पासुन होणार

मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात आरवली पासुन होणार

स्व. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त उपक्रम

भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार

वेंगुर्ला :

आरवली गावचे सुपूत्र आणि कोकणातील या लाल मातीवर इथल्या भाबड्या माणसांवर आपल्या लेखणीतून अपार प्रेम करणारे स्व जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दूरदर्शन ने आपल्या साहित्य मालिकेची सुरुवात आरवली येथील जयवंत दळवी यांचे मूळ घर तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्याच्यावर नितांत श्रद्धा बाळगली त्या आरवलीच्या वेतोबापासून छायाचित्रण करून केली.

याप्रसंगी मुंबई दूरदर्शन चे कार्यक्रम प्रमुख आणि सिंधुदुर्गाचे सुपूत्र श्री राजेश दळवी तसेच ख्यातनाम वृत्तनिवेदक श्री श्रीराम केळकर आपल्या टीम सह रविवार सायंकाळी आरवली गावात आले असता त्यांचे जयवंत दळवी यांचे पुतणे श्री सचिन दळवी व समकालीन मित्र श्री भाई मंत्री व श्री अनिल निखार्गे यांच्या तर्फे स्वागत तर करण्यात आलेच त्याही पलिकडे जाऊन या अस्सल लाल मातीतल्या साहित्यिकापासून दूरदर्शन ने या श्रृंखलेची सुरुवात केल्याबद्दल जिल्हा भाजप चे उपाध्यक्ष श्री प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या कडून ह्या टीम चे आभार देखील मानले गेले.

उपक्रमातील सक्रिय घटक म्हणून या प्रसंगी अटल प्रतिष्ठानचे अँड. नकुल पार्सेकर, श्री मोहन होडावडेकर, भाजपा प्रदेश का.का.सदस्य श्री शरद चव्हाण व भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. अमेय देसाई उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा