You are currently viewing बांदा केंद्र शाळेतील पाककृती स्पर्धेत निवेदिता शाॅ विजेत्या तर रूचि महाले उपविजेत्या

बांदा केंद्र शाळेतील पाककृती स्पर्धेत निवेदिता शाॅ विजेत्या तर रूचि महाले उपविजेत्या

*बांदा केंद्र शाळेतील पाककृती स्पर्धेत निवेदिता शाॅ विजेत्या तर रूचि महाले उपविजेत्या*

*बांदा

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत निवेदिता आशिष शाॅ यांनी प्रथम तर रुचि रूपेश‌ महाले यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
भारत हा जगातील तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश आहे . सध्या आपल्या राज्यात व देशात तृणधान्याचे क्षेत्र कमी होत असल्याचे दिसून येत आहे तसेच बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारात पौष्टीक तृणधान्याचा वापर‌ कमी होताना दिसत आहे.तृणधान्याच्या बाबतीत जनजागृती करून त्याचा आपल्या आहारात समावेश करावा यासाठी तृणधान्य या विषयावर आधारित ही पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शाळेतील पालकांनी तांदूळ,नाचणी ,बाजरी, ज्वारी, अशा विविध प्रकारच्या तृणधान्यापासून विविध प्रकारच्या पाककृती सादर‌ केल्या होत्या. या स्पर्धेत तृतीय क्रमांक संपदा देसाई तर उत्तेजनार्थ साक्षी पावसकर,राणी पाटील, गौतमी कर्पे,प्रविणा केसरकर,एकता शेर्लेकर यांनी मिळवला.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण डॉ.आरती देसाई, मास्टर शेफ संकेत वेंगुर्लेकर, ईश्वरी कल्याणकर‌ यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक श्री जे.डी.पाटील, रंगनाथ परब,फ्रान्सिस फर्नांडिस,मनिषा मोरे, सुप्रिया धामापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा