You are currently viewing खुशालचेंडू…!! माझं व्यंगचित्र!!

खुशालचेंडू…!! माझं व्यंगचित्र!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खुशालचेंडू…!! माझं व्यंगचित्र!!*

 

खुशालचेंडू बोलकं व्यक्तीमत्व

हेच माझं व्यंगचित्र

होतो गोंधळ माझाही

भावशय्येवर जपलं चरित्र..

 

धमण्यातून कंपकंपित आवाज

हास्यालाही दृष्ट लावतं

सांभाळतो ह्दयाला वेदनांपासून

नकारांनाही होकार देतं..!

 

कधी स्वप्नांत गातांना

सूर माझे हरवतात

कहाणी मुक्याने सांगताना

जगण्याचे अर्थ मिरवतात..

 

खुशालचेंडू कहाणी माझी

क्षणोक्षणी घाव संकटाचे

ओंजळीत गुलाब पेलतो

काट्यांनातरी किती जपायचे..

 

अंदाज ह्दयाचा खुळा

दुबळेपण कळत मला

मिश्किल डोळ्यांतून हसतो

आमंत्रण भोवत मला..

 

लटकं भांडण हवहवसं

माझचं माझ्या अस्तित्वाशी

हवेहवेसे रूसवे माझे

व्यंगचित्र जुळलं चरित्राशी..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा