ऑलिव्ह रिडलेच्या ९९ कासवांना समुद्री अधिवास
वेंगुर्ला
वायंगणी सुमद्रकिना-यावर १०८ ऑलिव्ह रिडले कासवांपैकी ९९ कासवांच्या पिल्लांना ९ फेब्रुवारी रोजी सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
वायंगणी समुद्रकिना-यावर चालू वर्षाच्या हंगामात सुमारे ७० ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी लावलेली आहेत. कासव विणीचा प्रजनन केंद्र म्हणून असलेल्या भागात या ७० विणींचे संरक्षण कासव मित्र सुहास तोरस्कर हे करत आहेत. ग्रामस्थ चंदू मोर्जे यांना २० डिसेंबर रोजी समुद्रकिना-यावरील अडगळीच्या ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची वाणे आढळून आली. याबाबत त्यांनी कावसमित्र सुहास तोरस्कर यांना त्याची कल्पना दिली. त्यानुसार श्री.तोरस्कर यांनी संबंधित कासवांची वाणे प्रजनन केंद्र येथे आणून त्यांना संरक्षित केले. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी ९९ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांना समुद्री अधिवासात सोडण्यात आले. यावेळी कांदळवन विभागाचे अधिकारी राज तेली, दत्ता मुकाडे, दिपक कांबळी, नयन घडशी, शुभम कांबळे, तसेच कासव मित्र सुहास तोरस्कर, ग्रामस्थ चंदू मोर्जे, संतोष साळगांवकर, सुरज तोरस्कर, संजय तोरस्कर, निलेश पेडणेकर आणि कोल्हापूर येथील योमा फाटक आदी उपस्थित होते.