You are currently viewing देवगड येथे जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धा

देवगड येथे जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धा

देवगड येथे जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धा

देवगड

तालुका मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त जिल्हा रिल्स स्पर्धा-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘बालशिवाजी’, ‘शिवतत्व-परस्त्री मातेसमान’ व ‘नवीन पिढीला महाराज समजले का?’ या विषयावर ही स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७,००१, सन्मानचिन्ह, ५००१, सन्मानचिन्ह, ३,००१ रु., सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल हा व्हीडिओचा तांत्रिक दर्जा, कॉन्टेन्ट बेस्ड, सादरीकरण यावर अवलंबून असणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वा. पर्यंत स्पर्धकांच्या रिल्स स्वीकारल्या जाणार आहेत. बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वा. इंद्रप्रस्थ हॉल येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी बंटी कदम (९४२२५८४५१९) व योगेश राणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड तालुका मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा