You are currently viewing उद्या १२ फेब्रुवारी रोजी कुडाळ तालुका भाजपचा मेळावा

उद्या १२ फेब्रुवारी रोजी कुडाळ तालुका भाजपचा मेळावा

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या १२ फेब्रुवारी रोजी भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ओरोस येथे भवानी मंदिर नजीकच्या पटांगणावर संध्याकाळी ४.३० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होईल. या मेळाव्यास खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुख्य उपस्थिती असेल. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती ही भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ओरोस मंडळ महिला अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, भाई सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा