You are currently viewing जवळ ये

जवळ ये

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जवळ ये* 

 

ये कविते

अशी जवळ ये

लाजू नको

आणि

बाजू होऊ नकोस

तुझा कवी तुला

कवेत घेण्यास

उत्सुक आहे

तुला तो

अर्धांगिनी म्हणून

स्विकारण्यास

इच्छूक आहे

त्याच्या अंतर्मनाचा ठाव घे

आणि

त्याच्या हृदयात तुझे

अढळ स्थान असू दे

आता तो तुझ्या प्रेमात

आकंठ बुडाला आहे

तुझ्या शिवाय त्याचे जगणे

म्हणजे

पाण्याशिवाय मासा जसे

इतके प्रेम तो तुझ्यावर करतो

म्हणून तू आता

लाजू नको

बाजू होऊ नकोस

तो तुला साद घालत आहे

ये कविते

अशी जवळ ये

जवळ ये….

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा