बांदा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्धर आजारी असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने शासनाने अशा रुग्णांसाठी आपल्या आजारावर मोफत सल्ला व उपचार ऑनलाईन मार्गदर्शनाद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बांदा शहरातील रुग्णांना पुणे येथील तज्ञ डॉक्टरकडून उपचार सल्ला मिळणार आहे.
यासाठी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरती देसाई यांच्या व्हाट्सअप्प क्रमांकावर (मो. ८४१२०६२७२४) रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णाचे संपूर्ण नाव, वय, पत्ता, आरोग्यविषयक तक्रारी, रक्त, मल-मूत्र तपासणी अहवाल, चालू औषधोपचार याची सविस्तर माहिती व वैद्यकीय अहवालाची छायाचित्रे पाठवायची आहेत.
रुग्णाच्या आजाराच्या वर्गवारीनुसार थेट पुणे येथुन डॉक्टर रुग्णांशी संवाद साधणार आहेत. बांदा शहरातील रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन डॉ. आरती देसाई यांनी केले आहे